पुणे, दि. २४/०४/२०२३: प्रिंटीग प्रेस आणि मीडिया हाउसमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेने एका व्यावसायिकाला तब्बल २ कोटी ४ लाखांवर गंडा घातला आहे. ही घटना ऑगस्ट २०१८ ते एप्रिल २०२३ कालावधीत मार्केटयार्डात घडली आहे. याप्रकरणी महिलेला मार्वेâटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
अपर्णा अशोक गिरी (रा. श्रीमंत अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमचंद पितांबर भोळे (रा. प्राधीकरण चिंचवड) यांनी मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रेमचंद आणि अपर्णा यांची ओळख २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने प्रेमचंद यांना प्रिंटींग प्रेस आणि मीडियाची माहिती देत गुंतवणूक करण्यास सांगितले. तुम्ही ३ कोटी रुपये गुंतविल्यास मी जादा परवाता मिळवून देईल, असे आमिष तिने दाखविले. त्यामुळे प्रेमचंद यांनी २ कोटी ४९ लाख रुपये व्यवसायात गुंतविले. काही महिने अपर्णाने त्यांना व्यवसायातील नफा मिळाल्याचे सांगत थोडे थोडे असे मिळून ४४ लाख ९० हजार रुपये माघारी दिले. उरलेल्या २ कोटी ४ लाख १० हजारांबाबत विचारणा केली असता, तिने पैसे देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. सरकारी वकील अॅड. अजिंक्य शिर्क आणि फिर्यादीतर्पेâ अॅड. धीरज कुचेरिया काम पाहत आहेत.
पावणेतीन कोटींची फसवणूकप्रकरणी निगडीत गुन्हा
निगडी प्राधिकरणातील प्लॉट विक्रीच्या बहाण्याने आरोपी अपर्णा गिरीसह तिघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी ७६ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नरेंद्र रामचंद्र शेंगर, धर्मा सोनू गोल्हार यांच्यासह अपर्णा गिरीविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले