पुणे, दि. २०/०८/२०२३ – लोणावळा परीसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या तीन तासात अटक केली आहे. त्याच्याकडून ६ मोबाईल, पाच पर्स, घड्याळे, मोटार असा १२ लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला आहे. जुने पुणे मुंबई हायवे रोडसह मळवली, कार्ला भाजे परीसरात येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेऊन आरोपी चोरी करत होता.
अखिल सलीम व्होरा (वय 32 रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु चोरून नेल्याची घटना १९ ऑगस्टला घडली होती. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन तक्रार देण्यास आल्या होत्या. याप्रकरणी पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे व पोलीस नाईक गणेश होळकर यांचे पथक रवाना करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता 30 ते 35 वयाचा चोरटा गाडीची काच फोडून चोरी करताना आढळले. पोलीसांनी संशयीत कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित चोरटा परीसरात संशयीतरित्या फिरत असताना मिळुन आला. पोलिसांनी त्याच्या मोटारीची झडती घेतली असता गाडीमध्ये 6 मोबाईल, 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, रोकड असा १२ लाखांचा ऐवज मिळुन आला.
चौकशीत आरोपीने काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याची कबुली दिली.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व्यतीरीक्त यापुर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असुन अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करुन गुन्हे उघडकीस आणन्याबाबत मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक सो यांनी सर्व पोलीस पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दोन गुन्हे घडताच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी तत्परता दाखवून यातील गुन्हेगारास शिताफीने अटक केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक. निलेश माने सो, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजयभाऊ मुंढे यांनी केली.
More Stories
हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोची खांब उभारणी अंतिम टप्प्यात
पुणे: दोन नवीन अतिउच्चदाब उपकेद्रांना महावितरणची मंजूरी; पिंपरी चिंचवड शहर, भोसरी, चिंचवड एमआयडीसी, आळंदी, धानोरी, लोहेगावसह २० गावांना फायदा
पवना धरण १०० टक्के भरले; नागरिकांना नदीपात्रापासून दूर रहाण्याचे आवाहन