पुणे, दि. २५: जिल्ह्यातील ३४-पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून ज्योती नारायण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०५ असा आहे. श्री. ज्योती नारायण यांचा संपर्क क्रमांक ९८११७५५४३९ व ०२०-२९९९७४३१ असा असून त्यांचा ईमले आयडी policeobserver34pune@gmail.com असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी विवेक पाडवी यांचा संपर्क क्रमांक ९८२३६६००७४ असा आहे. श्री.ज्योती नारायण हे सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत भेटतील, असे पुणे लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

More Stories
आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने नवी सांगवीतील ‘रोजगार मेळाव्यात’ १५४७८ पदांसाठी थेट मुलाखती
सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीसाठी विशेष पॉलिसी बनवणार- आमदार जगताप
तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप