पुणे, दि. १०/०७/२०२३: शहरात मध्यवर्ती ठिकाणांवर टोळक्याचा धुडगूस थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले आहे. एकमेकांकडे बघण्यावरुन टोळक्याने तरुणावर वार करुन गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर हवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई आहोत, आमच्यासोबत कोणी पंगा घेतल्यास,त्याला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दहशत निर्माण केली आहे. ही घटना ९ जुलैला रात्री दहाच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमला नेहरु चौकात घडली.
ऋतिक राजेश गायकवाड वय २२, उजेद शाहिद शेख वय २१, अरमान इकबाल शेख वय २० सर्व रा. मंगळवार पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे पाच साथीदार पसार असून पोलिस शोध घेत आहेत. वेदांत सारसेकर वय २६, रा. मंगळवार पेठ असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वेदांत आणि त्याचे मित्र ९ जुलैला रात्री दहाच्या सुुमारास नेहरू चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या ऋतिक, उजेद, अरमानने एकमेकांकडे बघण्याच्या रागातून वेदांतवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले. त्यांच्याकडील शस्त्रे हवेत फिरवून आम्हीच इथले भाई आहोत, आमच्यासोबत कोणी पंगा घेतल्यास,त्याला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत टोळक्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी तिघाजणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिली.
परिमंडळ दोनमध्ये कायदा सुव्यवस्था सुरळित होणार कधी
सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला, डेक्कन परिसरातील महाविद्यालयात कोयत्याने दहशत, संभाजी गार्डनमागे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी, कमला नेहरु चौकात टोळक्याने हवेत शस्त्रे फिरविल्याच्या घटनेमुळे परिमंडळ दोनच्या हद्दीत कायदा सुव्यस्था सुरळित होणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन