पुणे, दि. १०/०७/२०२३: नामांकित एच.पी. सॅमसंग, कॅनन व इफसन व डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणारे रॅकेट गुन्हे शाखा एक पथकाने उध्वस्त केले आहे. शुक्रवार पेठ मधील आण्णासाहेब खैरेपथ येथे प्रविण खोड, (वय-२८ रा. कात्रज कोंढवा रोड) दुकानात छापा टाकून पथकाने २८ लाखांचे साहित्य जप्त केले आहे.
सॅमसंग, कॅनन व इफसन कंपनीचे बनावट टोनर , कार्टेज ,आउटर बॉक्स ,पॅक इंक बॉटल , होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले साहित्य युनिट एकने दुकानातून जप्त केले. पथकाने तृप्ती ट्रेडर्स , प्रेम टॉईज , गणेश ट्रेडर्स, दुकानांवर छापा टाकला असता तिन्ही दुकानांतून बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शालेय साहित्य असा बनावट मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणांहून २८ लाखांचे बनावट साहित्य जप्त केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सैय्यद, आशीष कवठेकर, सुनिल कुलकर्णी, विठ्ठल पाटील, अमोल पवार, निलेश साबळे, अभिनव लडकत, शशीकात दरेकर यांनी केली.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद