February 28, 2024

पुणे: अन् कुलगुरूंनी सायकलवरून केली विद्यापीठाची भ्रमंती

पुणे, १०/०२/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी विद्यापीठाला ७५ सायकली भेट दिल्या.

यावेळी प्रा (डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा (डॉ) विजय खरे, डॉ राजेंद्र विखे पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे, व्यवस्थापन सदस्या बागेश्री मंथाळकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ नितीन घोरपडे, प्रा संदीप पालवे, सागर वैद्य, डॉ नितीन घोरपडे , डॉ धोंडीराम पवार, अधिसभा सदस्य श्री, सचिन गोरडे, रासयो संचालक डॉ सदानंद भोसले आदींनी सायकलवरून विद्यापीठात भ्रमंती केली. ४११ एकरमध्ये पसरलेल्या विद्यापीठात स्वतःची गाडी नसलेल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी पायी ये-जा करावी लागते.

त्यामुळे त्यांची ही पायपीट थांबावी म्हणून डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी या सायकली विद्यापीठाला भेट म्हणून दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.