May 16, 2024

पुणे: बेटिंग प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 बुकी जेरबंद

पुणे, २५/०५/२०२३: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने पुणे अहमदनगर रस्त्यावरील खराडी भागातील गॅलक्सी वन या सोसायटीतील ९ व्या मजल्यावरील एका फ्लॅटवर छापा टाकला आहे. आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेणार्‍यांचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 मोठ्या बुकीचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 16 मोबाईल हॅन्डसेट, 2 लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम असा एकुण 4 लाख 80 हजार 740 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.

जसप्रित मनजिंदरसिंग सिंह (29, मुळ रा. रस्ता नं. 10, शिवाजीनगर, लुधीयाना, पंजाब),तरणदीप बलजींदर सिंह (33, रा. शास्त्री स्कुलवाडी गल्ली, शिवाजीनगर, लुधीयाना, पंजाब),गौरव दयाराम धरमवाणी (27, मुळ रा. ब्लॉक शिवानंदनगर, खमतराई, रायपुर, छत्तीसगड), सुनिश तुलशीदास लखवानी (25, मुळ रा. महाविर स्कुल, गुडीयारी, रायपुर, छत्तीसगड),आणि लालकिशोर दुखी राम (37, मुळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार),जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा ( 25, मुळ रा. सिंधी गुरूव्दाराजवळ, रायपुर, छत्तीसगड), अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

खराडी येथील एका सासोयटीमधील एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. याबाबत मिळालेल्या माहितीची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिस पथकाने खराडी येथील गॅलक्सी वन सोसायटीमधील नवव्या मजल्यावर छापा टाकला.आरोपींकडे आढळलेल्या लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या वेबसाईटव्दारे टाटा आयपीएल 2023 च्या मुंबई इंडीयन्स विरूध्द लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतले जात होते.

कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक , अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे ,पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत , पोलिस हवालदार बाबा कर्पे , पोलिस हवालदार भिवरकर , पोलिस अंमलदार संदीप कोळगे, पोलिस अंमलदार अजय राणे , पोलिस अंमलदार सागर केकाण, पोलिस अंमलदार अमेय रसाळ , पोलिस अंमलदार किशोर भुजबळ ,पोलिस अंमलदार ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.