पुणे, १८ मे २०२६ : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने सोमवारी पुणे महानगरपालिकेवर बैलगाडी आणि टांगा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष श्रीकांतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनातून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईत आणखी भर पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पेट्रोल-डिझेलचे दर तातडीने कमी करावेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
मोर्चामध्ये बैलगाडी आणि टांग्यांचा वापर करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनपा भवन परिसरात आंदोलनामुळे काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी गटनेते काकासाहेब चव्हाण, महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, नगरसेवक गफुरभाई पठाण, नगरसेविका अनिताताई इंगळे, रविंद्रअण्णा माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन