October 14, 2024

पुणे: कात्रजमध्ये घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, दि. २४/०७/२०२३: बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख २८ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना २३ जुलैला रात्री तीनच्या सुमारास कात्रजमधील वाघजाई माता अपार्टमेंटमध्ये घडली.

याप्रकरणी केदार सावंत (वय ३२, रा. कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे कुटूंबियासह गुजर-निंबाळकरवाडीत राहायला आहेत. २३ जुलैला मध्यरात्री तीनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि हिर्‍याचे दागिने असा मिळून २२ लाख २८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.