पुणे, २५/०९/२०२३: समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन युवतीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका डाॅक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
डाॅ. शुभंकर महापुरे (वय २६,रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत युवती परगावची आहे. ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे.
समाजमाध्यमातून त्याची युवतीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने युवतीला जाळ्यात ओढले. त्याने युवतीला जेवण करण्यासाठी त्याने तिला नारायण पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले. जेवण करण्यापूर्वी त्याने तिला मद्य पाजले. मद्य प्याल्याने युवतीला गुंगी आली. डाॅ. महापुरे याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

More Stories
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!
पश्चिम पुण्यासह शहराच्या विविध भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद
४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली