पुणे, दि. १०/०७/२०२३: पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्याचा खुन करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलीसांनी जेरबंद केले आहे. खुनाची ही घटना १४ जूनला सकाळच्या सुमारास मालधक्का चौकात उघडकीस आली होती. मृतदेहाची ओळख पटु नये म्हणुन त्याचा चेहरा विद्रुप करुन पुरावा नष्ट केला होता. मात्र, बंडगार्डन पोलिसांनी ४०० तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपिला अटक केली आहे.
सुरज लल्ली आगवान, वय-३५ रा. राजपुर, जिल्हा – कानपूर, राज्य उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मालधक्का चौकाचे जवळ सीसीटीव्ही फुटेंजमध्ये खून झालेला तरुण एका महिलासोबत बोलत असल्याचे दिसुन आला. त्यानुसार पथकाने महीलेचा शोध घेतला.
चौकशीत तिने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणाने शरिरसुखाची मागणी केली होती. यावेळी तीचा पती सुरज आगवान याने त्यांना पाहिले होते. त्यामुळे दोघात याच कारणावरुन वादावाद झाली. त्यानंतर सुरजने त्याचा गळा दाबून खून करीत चेहरा विद्रुप केला होता.
बीट मार्शल ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकान यांना गुन्ह्यातील आरोपी सुरज आगवान हा शाहिर अमर शेख चौकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने तरुणाला मालधक्का चौक येथील रेल्वे वसाहतीमध्ये घेवुन जावुन त्याचा गळा दाबुन व डोक्यात दगडाने मारुन त्यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली.बंडगार्डन पोलीसांनी ४०० तासांपेक्षा जास्त व एकुण ३०-३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कामगिरी स्मार्तना पाटील, एसीपी आर.एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संतोष पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी. संदिप मधाळे, प्रभारी अधिकारी रविंद्र गावडे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकान, शरद ढाकणे, /शिवाजी सरक, मनोज भोकरे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर, मनिष संकपाळ, / राजु धुलगुडे यांनी केली.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा