लोणावळा, २४/०६/२०२३: खंडाळा घाटातील अंडा पाॅईंटजवळ अवजड ट्रकने मालवाहू टेम्पोला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. अपघातात दोघे जण जखमी झाले असून, जखमीमध्ये शाळकरी मुलाचा समावेश आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन खंडाळा घाटातून मुंबईकडे भरधाव ट्रक निघाला होता. अंडा पाॅईंट येथील तीव्र उतार आणि वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रकने दोन मालवाहू टेम्पोला धडक दिली. ट्रक उलटला. त्या वेळी ट्रक उलटून मालवाहू टेम्पाेवर आदळल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राज्य रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोतील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खोपोली पोलीस, आयआयबीचे पथक, महामार्ग पोलिसांच्या पथकाने क्रेनच्या सहायाने टेम्पो, ट्रक बाजूला काढला. अपघातानंतर काही काळ या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
More Stories
‘तर एखाद्याला मीच निलंबित करेल’ – गैरप्रकारांवरून अजितदादांची पोलिसांनाच तंबी
गुजरातचे माजी मंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी घेतला पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभांचा आढावा
पुणे : बाणेरमधील खड्ड्यंविरोधात भर पवासात महापालिकेविरोधात आंदोलन-