पुणे, ०२/०६/२०२३: शिवाजीनगर आणि खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम दिनांक 01 जून रोजी राबविण्यात आली ज्यामध्ये 150-200 अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या जो 550 x 20 मीटर रेल्वे जमिनीवर अनधिकृत कब्ज़ा होता व जमिनीचे बाजारमूल्य अंदाजित 05 कोटी रूपये आहे.
अतिक्रमण काढण्याची मोहीम वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त/रेल्वे सुरक्षा बल पुणे, सहायक सुरक्षा आयुक्त/रेल्वे सुरक्षा बल /पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली .
या संयुक्त अभियानात इंजीनियरिंग विभाग, जीआरपी आणि स्थानिक पोलिस ज्यात 50 गँगमन, रेल्वे सुरक्षा बल , जीआरपी आणि स्थानिक पोलिसांचे सुमारे 30 कर्मचारी आणि 04 जेसीबी मशीनचा देखील वापर करण्यात आला . ही कारवाई 08 तासांपेक्षा जास्त काळ चालली. रेल्वे परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढील काळातही अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येतील .

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन