पुणे, 2 जुन 023: रोहित शिंदे टेनिस अकादमी यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन – रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रोहित शिंदे टेनिस अकादमी टेनिस कोर्टस् या ठिकाणी 3 व 4 मे 2023या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 90 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून ही स्पर्धा 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धा संचालक रोहित शिंदे यांनी सांगितले.

More Stories
शरद पवार गटाने भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात सोडले कमळ
खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला
नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे योगदान: विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील