पुणे, २३/०८/२०२३: दारु पिताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली.
शैलेश मांडगीकर असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय २५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय २५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोटलापूरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला.
मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. पसार झालेल्या आराेपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील तपास करत आहेत.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ