रस्त्याने पायी चाललेल्या महिलेला पोलिसाची भीती दाखवून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ८५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास बिबवेवाडीतील लोअर इंदिरानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लोअर इंदिरानगर परिसरात राहायला असून २ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास त्या स्वामी समर्थ मंदीर परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला अडवून, पुढे पोलिस आहेत. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा. असे बोलण्यात गुंतविले. त्यानंतर महिला गळ्यातील मंगळसूत्र काढत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी ३ लाख ८५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करीत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही