पुणे, २७ जानेवारी २०२६: पुणे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर त्यांचा गटनेता निश्चित केला असून यासाठी माजी सभागृहनेतो आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांचे निवड केलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने अनुभवी चेहऱ्याला या पदावर संधी दिल्याचे स्पष्ट झालेले आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 27 जागा जिंकलेल्या आहेत. तर 119 जागा जिंकून भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती असली तर पुण्यामध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी ही सुमार दर्जाची झालेली असली तरी त्यांची सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात कमी नगरसेवकांची संख्या आहे.
प्रभाग क्रमांक 12 गोखलेनगर जनवाडी या प्रभागातून निलेश निकम यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे हरीश निकम यांचा पराभव करून विजय मिळवलेला आहे. निलेश निकम हे यापूर्वी चार वेळा नगरसेवक झाले होते. त्यामध्ये त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह येथे पद ही महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सभा नेता होण्यासाठी बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर अशी अनुभवी नगरसेवकांची इच्छा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश निकम यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यासाठी यादी सादर केली. त्यामध्ये गटनेता म्हणून निलेश निकम यांचे नाव नमूद करण्यात आलेले आहे. निलेश निकम हेच आता सभागृहात विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणार आहेत.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन