May 20, 2024

पुणे: गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा, पुनीत बालन यांच्या पुढाकाराने मंडळाच्या बैठकीत निर्णय

पुणे, ०९/०५/२०२४: पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी जाहीर पाठिबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे, त्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नासमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासनदरबारी जातील आणि ते सुटतील अशी भावना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या पुढाकाराने प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ, नवरात्रौ मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांच्या मेळाव्याचे शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासह सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शैलेश टिळक, राहुल जाधव, नितीन पंडित, विकास पवार, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे, निलेश वकील, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नवनाथ पठारे, हेमंत रासने, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रवीण तरडे, अजय भोसले, आनंद सागरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलताना पुनीत बालन म्हणाले, या मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर मला अनेकांनी विचारले की तुम्ही भाजपचे काम करता का , त्यावर मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. मुरलीधर मोहोळ हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून ते माझे मित्र आहेत. गणेश मंडळ हे नाळ आहे, राजकीय सामाजिक असो अथवा कोविड, स्वाईन फ्लू असे साथीचे आजार असोत मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला दिलीला पाठवायचे आहे. मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी पोहचतात. त्यामुळे येत्या १३ मे ला कोणावरही दबाव न आणता जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन बालन यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी म्हणाले, यांनी सास्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आयटी अशा सर्वच क्षेत्रात पुण्याचा देशभरात लौकिक आहे. हा लौकिक वाढवायचा असेल तर मंडळाचा कार्यकर्ता संसदेत पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोहोळ यांना पाठिंबा द्यावा लागेल. ते संसदेत गेले तर निश्चितपणे मंडळाचे प्रश्न शासनदरबारी जातील.

ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर म्हणाले, मंडळाचे जसे गणेश प्रश्न आहेत तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करणाऱ्या ढोल ताशा पथकांची सुध्दा आहे. या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपला खासदार हवा आहे.

प्रास्ताविकात नितीन पंडित म्हणाले, उत्सवाला राजाशर्य असणे अंत्यत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या मंडळातील कार्यकर्ताच खासदार झाला पाहिजे असे सांगितले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, अभिनेते प्रविण तरडे, धीरज घाटे यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत मोहोळ याना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

दरम्यान गणेश मंडळांच्या जाहीर पाठीब्यांने मोहोळ यांच्या बाजूने निवडणुकित मोठी ताकद उभी राहिली असून त्याचा फायदा त्यांना मोठ्या मताधिक्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दहा वाजले आणि स्पिकर बंद झाले

गणेशोत्सवात नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांनी या बैठकीतही नियमाचे पालन केले. बैठक सुरू असताना आणि पदाधिकारी स्टेजवर बसून बोलत असताना घड्याळात १० वाजले. यावेळी आयोजकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करीत लगेचच माईक आणि स्पीकर बंद केले. आणि स्टेजवर बसलेले मंडली खाली येऊन जेवणावळीत ही बैठक पार पडली.