October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: वानवडी परिसरात एकाचा खून, दोघे गंभीर जखमी

पुणे, दि. १७/०८/२०२३: वानवडी परिसरातील सय्यदनगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली . त्यामध्ये एकाचा खून करण्यात आला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी रात्री सय्यदनगर परिसरात घडली आहे. परिसरात मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, मागील तीन दिवसांत दोन खुनाच्या घटनांमुळे सराईत टोळ्यानी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे.

आजीम शेख उर्फ अंत्या (वय ३५, रा. वानवडी) असू खून झालेल्याचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेल्याची नावे मिळू शकली नाही. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजीम राहायला होता. त्याच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत. तो गुरुवारी रात्री सय्यदनगरमध्ये आला असता, विरूध्द गटांमध्ये वाद भडकला होता. त्यामध्ये वादावादी झाल्याने आजीमवर टोळक्याने घातक हत्याराने खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर वार झाल्यामुळे दोघांची बोटे तुटली आहेत. याप्रकरणी घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासला गती दिली आहे.