October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यास सन २०२३ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा व सन २०२२ परिक्षक सत्कार सोहळा कार्यक्रम

पुणे, २४/०८/२०२३: पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यास सन २०२३ शिष्यवृत्ती प्रदान सोहळा व सन २०२२ परिक्षक सत्कार सोहळा कार्यक्रम दि.२४/०८/२०२३ रोजी १२.०० वा. शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यासचे वतीने प्रतिकुल व अर्थिक सामाजीक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य व शैक्षणीक साहित्य वाटप कार्यक्रम सोहळा व परिक्षक सत्कार सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमामध्ये एन. एस. उमराणी, प्र कुलगुरु पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते व रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर तथा अध्यक्ष, पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यास हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमादरम्यान पुणे पोलीस व नागरीक विघ्नहर्ता न्यासाचे वतीने शिष्यवृती देण्यात आलेली विद्यार्थीनी नामे प्रिया मते हिने तिचे स्वतःचे वैयक्‍तीक मनोगत व्यक्‍त केले.त्यामध्ये तीने पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाचे वतीने सलग ३ वर्ष मला मिळालेली असून माझे घरची परिस्थिती हलाकीची असताना ही न्यासाचे विश्वस्त यांचेकडून मिळालेल्या मदतीचे आधारावर आज मी सी.ए.म्हणुन कार्यरत आहे. पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यास हे समाजातील गरजू विद्यार्थी यांना शिष्यवृती ब शैक्षणिक
साहित्य देवून शिक्षण घेणेसाठी प्रोत्साहीत करीत असते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना मदत होते. असे बोलुन सर्वाचे मनाला स्पर्श केला.

प्रमुख पाहुणे एन.एस.उमराणी यांनी उपस्थित पालक शिक्षक तसेच परिक्षक यांना शिक्षणाचे महत्व सांगून शिक्षणामुळे देश स्वाक्ष होत आहे.त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले समोर आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्व द्यावे पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यासाचे वतीने गरजू गरीब विद्यार्थ्याना सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती व शालेय साहित्य वाटपाच्या कामाचे कौतुक करुन यापुढे असाच अविरतपणे काम सुरु राहील याची ग्वाही दिली.

रितेश कुमार, पोलीस आयुक्‍त, पुणे शहर तथा अध्यक्ष पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास यांनी जिद्दी व अभ्यासू विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीसाठी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास सदैव पाठीशी राहील असे सांगून विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून भवितव्य उज्वल करून पुन्हा या योजनेला आपले योगदान द्यावे. असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन.एस.उमराणी, पोलीस आयुक्त रितेश कुमार
तथा अध्यक्ष पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास व मंचावरील उपस्थित पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्‍चिम प्रादेशिक विभाग) प्रविणकुमार पाटील, यांचे हस्ते पुणे पोलीस आयुक्‍त कार्यक्षेत्रातील ३० शाळे मधील ५२ विद्यार्थी यांना प्रत्येकी ३००० रु रोख व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच सन २०२२ मध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये परिक्षक म्हणुन परिमंडळ १ ते ५ मध्ये काम पाहणारे परिक्षक यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमास पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त तसेच परिमंडळ १ते ५ चे पोलीस उप आयुक्त व विभागीय सहा पोलीस आयुक्‍त हजर होते.

विघ्नहर्ता न्यासचे संदीप सिंह गिल्ल,पोलीस उप आयुक्‍त, परिमंडळ १, पुणे शहर तथा सचिव, पुणे पोलीस व नागरी विघ्नहर्ता न्यास यांनी प्रास्ताविक केले. सुत्र संचालन विश्वस्त डॉ. मिलींद भोई यांनी केले. राधीका कुलकर्णी, नागरी विश्वस्त, पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास यांनी आभार प्रदर्शन केले.