पुणे, 17/8/2026: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांचाही शिष्टमंडळाने विशेष सत्कार केला.
पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवरील धडक कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या याच गतिमान आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे पुणे शहर आणि पोलीस दलाचा लौकिक अत्यंत वाढल्याची भावना या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
या विशेष सत्कार प्रसंगी पुणे शहराचे माजी नगरसेवक अय्युब शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेना नेते अजय भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, शिवसेनेचे मिलिंद आहिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद आणि इतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी