April 27, 2025

पुणे: वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

पुणे, ०१/०७/२०२३: वरिष्ठ पत्रकार संदीप अशोक कोर्टीकर, वय 50, रा. सहवास सोसायटी, कोथरूड (मूळ रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी वंदना, मुलगी नेहा, मुलगा अथर्व असा परिवार आहे.

त्यांनी केसरी, लोकसत्ता, सकाळ, टाइम्स ग्रुप, लोकमत अशा प्रतिष्टीत वृत्तपत्रात अनेक वर्षे पत्रकारिता केली. मनमिळावू आणि इतरांना मदत करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक पत्रकारानाही घडवले आहे. सध्या ते मुक्त पत्रकार व माध्यम समन्वयक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे.