पुणे, दि. २६/०९/२०२३, धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील गुडविल ब्रीझा सोसायटीमध्ये रविवारी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला सोसायटीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोसायटीतील ६० हून अधिक सदस्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
गणेशोत्सवानिमित्त सोसायटीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिर हा त्याचाच एक भाग होता. औंध जिल्हा रूग्णालयातील अधिकाऱी व स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. तरूणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी सहभागी सदस्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सोसायटीच्या वतीने रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. यंदा शिबिराला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, उत्सवी गोष्टींवरील अनावश्यक खर्च टाळून अधिकाधिक मानवताकेंद्री व समाजोपयोगी कामांसाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सोसायटीतील सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले.
More Stories
ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले; डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन
महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन