पुणे, दि. 04/05/2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी एकूण २ लाख १८ हजार ९६९ मते मिळवत विजय झाल्या.
या निवडणुकीत प्रा. आर. वाय. घुटुकडे (नवीन राष्ट्रीय समाज पार्टी) यांना ९३५ मते, तर सतीश कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी) यांना १७० मते मिळाली.
अपक्ष उमेदवारांमध्ये डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (३३३), ॲड. अविनाश वामनराव गायकवाड (९२), करुणा धनंजय मुंडे (३०१), गजानन शांताबाई उत्तम गवळी पाटील (४७), चंद्रकांत रंभाजी मोटे (४२), चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (४०३), दत्तात्रय रावसो बेदरे (४३), बाळासो मारुती धापटे (५७), रोहित राजू भोसले (७०), मिथुन सोपानराव आटोळे (१२३), मंगलदास तुकाराम निकाळजे (१३७), योगेश मोहन योमो (५०), डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे (२९८), विराज महादेव शिंदे (५३३), शिवाजी जयसिंग कोकरे (१४६), सतीश नाना सोनवणे (४८), सागर शरद भिसे (४५), साजन भगवान अडसूळ (८५), सिताराम विठ्ठल रणदिवे (४५) आणि सोनाली सूर्यकांत राणे (१३२) यांनी मते मिळवली. ‘नोटा’ला ७७४ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रतिनिधी किरण गुजर यांना फॉर्म २२ नुसार विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

More Stories
‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनातून युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी सीओईपीमध्ये एबीव्हीपी-काँग्रेसमध्ये राडा
सूसमधील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर नाहीच, प्रशासनाची भूमिका