पुणे, दि. १०/०७/२०२३: मॉलमध्ये येणा-या ग्राहकांना वॅलेट पार्कींग करुन देतो असे भासवुन त्यांची चारचाकी वाहने चोरणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १५ लाखांची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ऋग्वेद चंद्रकांत भिसे, वय २३ , रा. एस. आर. ए बिल्डीग, प्रयेजा सिटी मागे, सिंहगड रोड असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कात्रज कोंढवा रोडवर मोटार वाहन चोरट्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने ऋग्वेद चंद्रकांत भिसे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी नारायण शिरगावकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, समीर कदम, उप निरीक्षक गौरव देव, यांच्या पथकाने केली आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही