पुणे, २४/०६/२०२३: लोणी काळभोर भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने ३६ वर्षीय प्राध्यापिकेची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत, तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच हजार डाॅलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयीन युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयंक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार प्राध्यापक महिला लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेते आहे. मयंक सिंगने प्राध्यापिकेला समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती. त्यानंतर त्याने समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केली. मी सांगितले तसे नाही केले तर समाजमाध्यमात तुमची छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेला धमकावून तिची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत तयार केली.
त्यानंतर राॅबिन नावाच्या खातेधारकाने महिलेस धमकावले. महिलेची ध्वनिचित्रफीत त्याने पतीस पाठविले, तसेच त्यांच्याकडे पाच हजार रुपये अमेरिकन डाॅलरची मागणी केली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या प्राध्यापिक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गंधाले तपास करत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.