पुणे, दि. १० फेब्रुवारी २०२३: नगररस्त्यावर ९ बीआरडी येथे महावितरणच्या उच्चदाब फिडर पिलरशी संबंधित विद्युत धक्क्याने भगवान फुलतांबकर यांचा गुरुवारी (दि. ९) दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र २२ केव्ही टेक पार्क या उच्चदाब वीजवाहिनीचा हा फिडर पिलर सुस्थितीतच होता असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. या फिडर पिलरची दि. १६ जुलै २०२२ रोजी नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात आली होती. या फिडर पिलरला लोखंडी पत्रे लावलेले होते. दोन्ही बाजूने दरवाजे लावलेले होते. संपूर्ण फिडर पिलर व त्यातील वीजवाहिनीपासून कोणताही धोका नव्हता. अशा परिस्थितीत फिडर पिलरमध्ये सदर व्यक्ती कोणत्या उद्देशाने गेला व अपघात कसा घडला असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या विद्युत अपघाताची कारणे शोधण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरु आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही