May 18, 2024

नवव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेस 13 फेब्रुवारीपासून प्रारंभ

पुणे, 10 फेब्रुवारी 2023 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने नवव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि.13 ते 18 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पुना क्लब क्रिकेट मैदानावर होणार आहे.

पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल हांडा , उपाध्यक्ष गौरव गढोके यांनी सांगितले की, स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून संघांचे मालक हे क्लबचे सदस्य आहेत. यावेळी क्लबचे व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव कर्नल सरकार आणि पीसीपीएल 2023 स्पर्धेतील समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.  

 
विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला  जेट सिंथेसिस यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. देसाई ब्रदर्स लिमिटेड, एलिका, 1 अर्थ वेलनेस, वर्ल्ड वेब सोल्युशन्स, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, हिलयॉस, सुराणा ट्रेडर्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहेत.  लिलावात रौनक ढोले पाटील, आरव वीज, अभिषेक ताम्हाणे आणि किरण देशमुख हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.  
 
स्पर्धेत जेट्स(राकेश नवनी), वन अर्थ गोरिलाज(आदर्श हेगडे), जीएम टायफून्स(आश्विन शहा), क्वालिटी वॉरियर्स(आरव वीज), मॅक्झिमम मावरिक्स(राजीव संतानी व ललित सोळंकी), मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), व्हीएस टायगर्स(विक्रम काकडे व सलीम तालब), फोर ओक्स ओव्हन फ्रेश सेलर्स(सुमीरन मेहता व समीर बाकरे), कपिला परमार स्टार्स(हिरेन परमार व कपिल ढोले पाटील) हे 10 संघ सहभागी झुंजणार आहेत.  
 
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत.

स्पर्धेतील 10 संघांची  2 गटात 
प्रत्येकी 5 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे.  तसेच, या दोन्ही गटांतील अव्वल चार संघ ग्रुप एलिमिनेटरसाठी पात्र ठरणार असून यातील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 18 फेब्रुवारी 2023 या दिवशी होणार आहे. विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहे.
 
याशिवाय महिला व क्लबच्या सदस्यांच्या लहान वयोगटासाठी देखील अंतिम फेरीच्या दिवशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबरोबरच सर्व खेळाडूंना व उपस्थितांना खेळाबरोबरच खाद्यपदार्थ, मनोरंजन याची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. 
 
 स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गौरव गढोके(स्पर्धा अध्यक्ष), अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक)यांचा समावेश आहे. कारा इन्टलेकट याच्या संकल्पनेतून व व्यवस्थापनेतुन ही स्पर्धा पार पडणार आहे.