पुणे, दि.३/०७/२०२४: तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीत राहणाऱ्या समस्याग्रस्त ८० वर्षीच ज्येष्ठ नागरिकाची समाज कल्याण विभागाच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून सुटका केली. सुटका केल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येणार आहे.
सांची इंटिग्रेशन असोसिएशन पुणे या संस्थेने तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या गंगाधर कडाळी यांना नातेवाईकांडून वाईट वागणूक दिली जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला दिली. माहिती मिळाल्यावर सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी एन.एस. मकवाना आणि सीमा पांचाळ यांना माहिती घेण्यासाठी कडाळी यांच्याकडे पाठविले.
ज्येष्ठ नागरिक कडाळी हे त्यांच्या मुलीच्या घरी रहात होते. समाज कल्याण विभागाच्या पथकाने घरी भेट दिली असता टेरेसवर अनारोग्यदायी वातारणात पलंगावर ते बसलेले आढळले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती. पथकाने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी होणारा त्रास सांगतांना वृद्धाश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली.
सांची इंटिग्रेशन असोसिशनचे डी.आर.परिहार, मकवाना आणि श्रीमती पांचाळ यांनी कडाळी यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याची व्यवस्था समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शासकीय वसतीगृहाच्या अधीक्षकांनी दिली आहे.
नागरिकांनी वृद्ध व्यक्तींची योग्यप्रकारे काळती घ्यावी. योग्यप्रकारे काळजी न घेतल्यास ज्येष्ठ नागरिक व आईवडील यांचे चरितार्थ अधिनियम २००७ नियम २०१० नुसार संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि समाज कल्याण विभागातर्फे निर्वाह भत्ता वसूल करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन