पुणे, २३/०७/२०२३: शहरात गांजा, अफू विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. दोघांकडून अफू, गांजा असे तीन लाख २२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हडपसर आणि भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वीरमाराम बिश्नोई (वय ३०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक भारती विद्यापीठभ भागात गस्त घालत होते. भारती विहार सोसायटी परिसरात एकजण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने बिश्नोईला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपयांची १५० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. मांजरी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेवून तिच्याकडून १२ हजार रुपयांचा ६३२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी महिलेविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, प्रवीण उत्तेकर, संदीप शिर्के, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद