October 14, 2024

पुणे: वारजे भागात तरुणावर गोळीबार

पुणे, १७/०६/२०२३: वारजे माळवाडी भागात भरदिवसा तरुणावर पिस्तुलातून झाल्याची घटना घडली. तरुणावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सूरज तात्याबा लंगार (वय २१, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. लंगार याच्यावर झालेल्या गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास भागातील जयभवानी चाौकातील पाण्याच्या टाकीजवळून सूरज निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. गोळीबाराची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच परिसरात घबराट उडाली असून पसार झालेल्या हल्लेखाेरांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे.