May 11, 2024

22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत पुणेरी वॉरियर्स, केपी इलेव्हन, जीओजी एफसी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, दि. 29 डिसेंबर 2023 – गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत पुणेरी वॉरियर्स यांनी तर सुपर डिव्हिजन गटात केपी इलेव्हन, जीओजी एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जुनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत आदित्य नागवडे(28 मि.) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पुणेरी वॉरियर्स संघाने सांगवी एफसी ब संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.

सुपर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत केपी इलेव्हन संघाने सिग्मय एफसी संघाचा 8-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. केपी इलेव्हनकडून अल्फ्रेड नेगल(14 मि.) याने तर सिग्मय एफसीकडून गुलाम अली(28मि.)याने गोल केला. टायब्रेकरमध्ये दोन्ही संघांमध्ये 5-5 अशी बरोबरी निर्माण झाल्यामुळे सडनडेथमध्ये खेळविण्यात आला. केपी इलेव्हनकडून कैलाश परदेशी, बेवन चोरप्पा, संतोष राठोड, ऍडविन फलेरो, निरहान छेत्री, अल्फ्रेड नेगल, निलेश परदेशी यांनी गोल केले. सिग्मय एफसीकडून हुडा सिंग, रवी यादव यांना गोल मारण्यात अपयश आले. दुसऱ्या मसण्यात जीओजी एफसी संघाने इंद्रायणी एफसीचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून प्रकाश थोरात(29मि.)याने गोल केला.

निकाल: जुनियर डिव्हिजन: उपांत्यपूर्व फेरी:
पुणेरी वॉरियर्स: 1 (आदित्य नागवडे 28 मि. पास-संदेश सरोदे)वि.वि.सांगवी एफसी ब: 0;

सुपर डिव्हिजन: उपांत्यपूर्व फेरी:
केपी इलेव्हन: 8 (अल्फ्रेड नेगल 14 मि., कैलाश परदेशी, बेवन चोरप्पा, संतोष राठोड, ऍडविन फलेरो, निरहान छेत्री, अल्फ्रेड नेगल, निलेश परदेशी)(गोल चुकविला-लकी शेटके) सडनडेथ मध्ये सिग्मय एफसी: 7(गुलाम अली 28मि., विकास अडागळे, जोएल लालरेमरुता, अंकुश कुमार, मोहित चौगुले, गुलाम अली, सचिन चांदे)(गोल चुकविला – हुडा सिंग, रवी यादव); पूर्ण वेळ: 1-1; टायब्रेकर: 5-5;

जीओजी एफसी: 1(प्रकाश थोरात 29मि.पास-सुमित भंडारी)वि.वि.इंद्रायणी एफसी: 0

आजचे सामने: (30 डिसेंबर 2023):
जुनियर डिव्हिजन: उपांत्य फेरी:
11.30वाजता: पुणेरी वॉरियर्स वि.हायलँडर एफसी;
12.30वाजता: दुर्गा एफसी वि.इन्फन्ट्स एफसी;

सुपर डिव्हिजन: उपांत्य फेरी:
2.00वाजता: केपी इलेव्हन वि.जीओजी एफसी;
3.30वाजता: युकेएम अ वि.थंडरकॅट्स