May 20, 2024

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना, आर्यन्स क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी सलामी

पुणे, 25 ऑक्टोबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदु जिमखाना, आर्यन्स क्रिकेट क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र आणि ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत स्वप्निल फुलपगार(नाबाद 167धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 22 यार्ड्स संघाचा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 50षटकात 6 बाद 376धावा केल्या. यात स्वप्निल फुलपगारने 104चेंडूत 21चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 167धावा चोपल्या. त्याला राहूल देसाईने 50चेंडूत 4चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 56धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 95चेंडूत 133 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात 37.4 षटकात सर्वबाद 171धावाच करू शकला. यात नितीश कुकडेजा 45, ऋषिकेश दौंड 22, गौरव कुमकर 31 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवायसीकडून दिव्यांग हिंगणेकर(3-26), यश माने(3-33), आदित्य डावरे(2-10) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाला 205 धावांनी विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात आनंद ठेंगे(नाबाद 44 व 6-52) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने रिक्रीएशन क्रिकेट क्लबचा 274धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत निकित धुमाळ 45धावा व 4-37) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पीबीकेजेसीए संघाचा संघावर 4धावांनी विजय मिळवला.ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी मैदानावरील लढतीत सार्थक वाळके(3-26)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी संघाने केडन्स संघाचा 75 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन एमसीएचे मानद सचिव शुभेंद्र भांडारकर, दोशी इंजिनिअर्सचे संचालक अमित दोशी आणि राजीव एन्टरप्रायझेसचे विजय जना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर, पीवायसी हिंदु जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, आशुतोष सोमण, निरंजन गोडबोले, नंदन ठाकुर आणि पराग शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: आर्यन क्रिकेट मैदान:
आर्यन्स क्रिकेट क्लब: 50 षटकात 9 बाद 424धावा(हरी सावंत 122(82,13×4,8×6), अजित गव्हाणे 71(76,9×4), शुभम तैसवाल 67(38, 9×4,3×6) , आनंद ठेंगे नाबाद 44(30,7×4,1×6), सौरभ दोडके 23, श्रेयस जीवने 3-70, सौरभ दिघे 4-86) वि.वि.रिक्रीएशन क्रिकेट क्लब: 29 षटकात सर्वबाद 150धावा(सौरभ संकलेचा 68(58, 10×4,2×6), मानस कोंढरे 20, आनंद ठेंगे 6-52, अक्षय काळोखे 1-19); सामनावीर – आनंद ठेंगे; आर्यन्स संघ 274 धावांनी विजयी;

शिंदे हायस्कूल मैदान:
क्‍लब ऑफ महाराष्ट्रः 27.3 षटकात सर्वबाद 140धावा(निकित धुमाळ 45, नौशाद शेख 33, सचिन भोसले 4-51, हितेश वाळुंज 3-29) वि.वि.पीबीकेजेसीए: 28.3 षटकात सर्वबाद 136धावा(ओंकार खाटपे 56(39,7×4,4×6), विशांत मोरे 24, निकित धुमाळ 4-37, केदार बजाज 4-30); सामनावीर – निकित धुमाळ; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 4 धावांनी विजयी;

पीवायसी हिंदू जिमखाना मैदान:
पीवायसी हिंदू जिमखाना: 50षटकात 6 बाद 376धावा(स्वप्निल फुलपगार नाबाद 167(104,21×4,5×6), राहुल देसाई 56(50,4×4,2×6), अद्वैय शिधये 43, दिव्यांग हिंगणेकर 33, श्रेयश वाळेकर 26, सागर सिंग 2-48, गौरव कुमकर 2-75) वि.वि.22 यार्ड्स: 37.4 षटकात सर्वबाद 171धावा(नितीश कुकडेजा 45(54,5×4,2×6), ऋषिकेश दौंड 22, गौरव कुमकर 31, दिव्यांग हिंगणेकर 3-26, यश माने 3-33, आदित्य डावरे 2-10); सामनावीर – स्वप्निल फुलपगार; पीवायसी संघ 205 धावांनी विजयी.

ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी मैदान:
ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी : 50 षटकात 9बाद 279धावा(प्रज्वल घोडके 62(75,8×4), उत्कर्ष चौधरी 73(84,4×4,3×6), विराज आवळेकर 41, निखिल जोशी 25, स्वप्नील गुगळे 4-57, यतिन मांगवानी 4-57)वि.वि.केडन्स: 43.3 षटकात सर्वबाद 204धावा(स्वप्नील गुगळे 50(80,4×4,1×6), अनिकेत पोरवाल 49(52,4×4,1×6), निपुण गायकवाड 29, हर्षद खडीवाले 28, रौनक दुबे 3-39, सार्थक वाळके 3-26, हितेन पटेल 2-30)सामनावीर-सार्थक वाळके; ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी 75 धावांनी विजयी