May 20, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत एमसीए अ संघाचा केडन्स संघावर दणदणीत विजय

पुणे, दि. 25 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज साहिल मदार(8-16 व 2-32), समेक जगताप (5-27) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमसीए अ संघाने केडन्स संघावर एक डाव व 3 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
विराज क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या या दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी केडन्स संघाचा दुसरा डाव आज दिवसअखेर 30 षटकात 7बाद 105धावापासून खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल केडन्स संघाचा डाव 24.5 षटकात सर्वबाद अवघ्या 55धावावर धावांवर कोसळला. प्रत्युत्तरादाखल एमसीए अ संघाला 32.3 षटकात सर्वबाद 175धावापर्यंत मजल मारता आली. एमसीए अ संघाने केडन्स संघाविरुद्ध पहिल्या डावात 120 धावांची आघाडी घेत त्यांच्यावर फॉलोऑन लादला.
याच्या उत्तरात केडन्स संघाचा डाव 35.4षटकात सर्वबाद 117धावावर संपुष्टात आला. यात तनिष्क खेडकर 29, मोहम्मद अरकम सय्यद 29, अनुज साळवी 24यांनी थोडासा प्रतिकार केला. एमसीए अ संघाकडून समेक जगताप(5-27), आफताफ शेख(2-27), साहिल मदर(2-32) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला एक डाव व 3 धावांनी विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
पहिला डाव: केडन्स: 24.5 षटकात सर्वबाद 55धावा(मोहम्मद अरकम सय्यद 18, मोहित कटारिया नाबाद 12, साहिल मदार 8-16, कपिल पवार 1-7, आदिनाथ प्रभालकर 1-18) वि.एमसीए अ: 32.3 षटकात सर्वबाद 175धावा(आयुष रक्ताडे 60(39,9×4,3×6), अभिनंदन गायकवाड 32(38,5×4), सुमित अहिवळे 55(73,8×4), पुष्कर अहिरराव 16, मोहम्मद अरकम सय्यद 5-51, इशान लोया 2-7, निलय शिंगवी 1 -39); एमसीए अ संघाकडे पहिल्या डावात 120 धावांची आघाडी;
दुसरा डाव: केडन्स: 35.4षटकात सर्वबाद 117धावा(तनिष्क खेडकर 29, मोहम्मद अरकम सय्यद 29, अनुज साळवी 24, समेक जगताप 5-27, आफताफ शेख 2-27, साहिल मदर 2-32) वि.एमसीए अ: . एमसीए अ संघ एक डाव व 3 धावांनी विजयी.