December 2, 2023

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स संघाची विजयी सलामी

पुणे, दि.22 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत रेव्हन्स संघाने विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत ब गटाच्या लढतीत रेव्हन्स संघाने फाल्कन्स संघाचा असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडूनतेजस चितळे, बिपिन चोभे, केदार नाडगोंडे, विक्रांत पाटील, अमोल मेहेंदळे, हर्षल जोगळेकर, प्रांजली नाडगोंडे, देवेंद्र राठी, रोहित भालेराव, अविनाश दोशी,गिरीश मुजुमदार, नील हळबे  यांनी सुरेख कामगिरी केली.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, अभिषेक ताम्हाणे, सिध्दार्थ भावे, शिरीष साठे, नंदन डोंगरे, केदार नाडगोंडे, दिप्ती सरदेसाई, समीर जालन, रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट ब: रेव्हन्स वि.वि.फाल्कन्स
गोल्ड ओपन दुहेरी 1: तेजस चितळे/बिपिन चोभे वि.वि. देवेंद्र चितळे/जितेंद्र केळकर 21-11, 21-10; गोल्ड ओपन दुहेरी 2: केदार नाडगोंडे/विक्रांत पाटील वि.वि.मकरंद चितळे/नितीन कोनकर 21-20, 21-19; खुला दुहेरी 3: अमोल मेहेंदळे/हर्षल जोगळेकर वि.वि.यश काळे/अमर श्रॉफ 21-16, 17-21, 15-13; खुला दुहेरी 4: विनित रुकारी/कुणाल शहा पराभुत वि.
अभिजित राजवाडे/योहान खिंवसरा 17-21, 19-21; मिश्र दुहेरी 5: प्रांजली नाडगोंडे/देवेंद्र राठी वि.वि.चंद्रशेखर आपटे/ऋषिका आपटे 21-18, 21-16; खुली दुहेरी 6: रोहित भालेराव/अविनाश दोशी वि.वि.आरुषी पांडे/चैतन्य वालिंबे 15-08,15-07; खुला दुहेरी 7: तन्मय चितळे/मंदार विंझे पराभुत वि.अथर्व राजे/आदित्य अभ्यंकर 15-08, 10-15, 14-15; खुला दुहेरी 8: गिरीश मुजुमदार/नील हळबे वि.वि. यशोधन पानसे/हिमांशू थोरात 09-15, 15-06,15-.08