October 3, 2024

पहिल्या जेके ईसीए एकदिवसीय फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत रित्विक कृष्णनचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे, 12 ऑगस्ट, 2023: एक्सलंस चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित किंग्ज इंडियन चेस क्लब,एनबीएम व चेसलव्हर्स ग्रुप यांचा पाठिंबा लाभलेल्या पहिल्या जेके ईसीए एकदिवसीय फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत फिडे मास्टर महाराष्ट्राच्या रित्विक कृष्णन याने ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती जेचा पराभव करून आजचा दिवस गाजवला. 
 
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर आठ खेळाडूंनी ५ गुणांसह संयुक्तरित्या आघाडी प्राप्त केली. पहिल्याच पटावरील ग्रँडमास्टर मित्रभा गुहाने आर्यन देशपांडेचा पराभव करून 5 गुण मिळवले. २०५५ रेटिंग असलेल्या रित्विक कृष्णन याने २३७८ रेटिंग असलेल्या दीपन चक्रवर्ती जेला पराभवाचा धक्का देत 5 गुणांची कमाई केली. 
 
आंतरराष्ट्रीय मास्टर  कुशाग्र मोहनने बालकिशन एवर विजय मिळवत 5 गुण प्राप्त केले. तर, कार्तिकेयन पी., ऋत्विज परब, आकाश दळवी, कशिश जैन,अक्षय बोरगावकर यांनी 5 गुण मिळवले. रत्नाकरन के. व वीरेश शरनार्थी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.  
 
याआधी स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर,  रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलचे अध्यक्ष व प्रतिमा इंडस्ट्रीजचे मालक प्रसाद काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक सजनदास जोशी स्पर्धेच्या संचालिका जुईली कुलकर्णी, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पाचवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
आर्यन देशपांडे (4गुण)पराभुत वि.मित्रभा गुहा (5 गुण);
दीपन चक्रवर्ती जे. (4 गुण)पराभुत वि.रित्विक कृष्णन(5गुण);
बालकिशन ए.(4गुण)पराभुत वि.कुशाग्र मोहन (5गुण);
रत्नाकरन के. (4.5गुण)बरोबरी वि.वीरेश शरनार्थी(4.5गुण);
कार्तिकेयन पी. (5गुण)वि.वि.आदित्य सावळकर (4गुण);
ऋत्विज परब (5गुण)वि.वि.प्रथमेश शेरला (4 गुण);
प्रज्वल आव्हाड (4 गुण)पराभुत वि.आकाश दळवी(5गुण);
ईशान तेंडोलकर(4 गुण)पराभुत वि.कशिश जैन(5 गुण);
अक्षय बोरगावकर (5 गुण)वि.वि.ऋषिकेश कबनुरकर(4गुण);
रोश जैन (4 गुण)बरोबरी वि.सिद्धांत ताम्हणकर(4गुण);
रेयान मो. (4.5गुण)वि.वि.विक्रमादित्य कुलकर्णी (3.5गुण);
शरण राव (4.5 गुण)वि.वि.अर्पित पांडे (3.5 गुण);
रवींद्र निकम (3.5गुण) पराभुत वि.मंदार लाड (4.5गुण);
इशान वरूडकर (3.5गुण)पराभुत वि.दक्ष गोयल(4.5गुण);
अंकुर गोखले (4गुण)बरोबरी वि.आहान शर्मा (4गुण);
साहिल धवन (3.5गुण)पराभुत वि.विहान दावडा (4.5गुण);
विष्णु प्रसन्न. व्ही(4गुण)वि.वि.गीतेश मिश्रा(3.5गुण);
आदित्य गाम्पा (4गुण)वि.वि.निशांत जवळकर (3गुण);
सुदीप सिंग (3गुण)पराभुत वि.हर्षिता गुड्डान्ति(4गुण).