पुणे, ५/०९/२०२३: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी तिचे वडील बेवारस अवस्थेत सापडले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
गौतमीचे आई-वडील वेगळे राहतात. गौतमी तिच्या आईबरोबर राहते. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील रवींद्र पाटील यांची प्रकृती खालावली होती.
धुळ्याजवळील सूरत महामार्गावर दुर्गेश चव्हाण यांना ते बेवारस अवस्थेत सापडले होते. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती. त्यांना धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडे आधारकार्ड सापडले.
त्यानंतर चव्हाण यांनी गौतमशी संपर्क साधला. गौतमीने त्यांना उपचारासाठी पुण्यात आणले होते. बिबवेवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. धनकवडीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ