October 5, 2024

‘तर एखाद्याला मीच निलंबित करेल’ – गैरप्रकारांवरून अजितदादांची पोलिसांनाच तंबी

चाकण, १२ सप्टेंबर २०२४ : देहू-आळंदी परिसरातील दोन नंबरचे धंदे पोलिसांनी तात्काळ बंद न केल्यास एखाद्या अधिकाऱ्यास मीच निलंबित करून पुढील कारवाई करेल असा सज्जड दम अजित पवारांनी पोलिसांनाच भरला आहे. ते चाकणमध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवारांनी पुण्यात नवीन सात पोलीस स्टेशनला तर, पिपंरी चिंचवडमध्ये चार नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी दिल्याचेही सांगितले.

अजित पवार म्हणाले, मला येथे आल्यानंतर माझ्या मायमाऊलींना एक वाईट बातमी सांगितली की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत आणि तुकाराम महाराज्यांच्या देहुत चुकीचे आणि दोन नंबरचे धंदे सुरू असल्याचे सांगितले. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय येतो. तेथे गेल्यानंतर समाधीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. पण त्या ठिकाणांवर ज्या प्रकारे दोन नंबरचे धंदे चालले असल्याचे अजित पवार म्हणाले. आज दुपारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. त्यात सुरू असलेले सर्व दोन नंबरचे धंदे बंद नाही झाले तर, मी खरचं कुणाला तरी निलंबित करेल किंवा कडक कारवाई करेल असा सज्जड इशारा अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे.

मागे आलो तेव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागल्याचे सांगत, लोकं म्हणतील हा कोण लागून गेला. जे याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं असं भाविक म्हणणार म्हणून मी आज बाहेरूनचं दर्शन घेतल्याचे अजित पवारांनी सांगत आळंदीत घडणाऱ्या चुकीच्या प्रकारांवर चिंता व्यक्त केली. आता मी पोलिसांना हवं ते देतोय, मात्र त्यांचं काम नाही का? दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे.

पोलिस ठाण्यांची संख्या वाढणार
पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सांगितले की, मला सात पोलीस स्टेशन पाहिजे. मी काल (दि.११) त्यांची सात पोलीस स्टेशन मान्य केली. पिंपरीचे आयुक्त चौबेंनी सांगितले की, मला चार पोलीस स्टेशन हवे आहेत. त्यांना मागणीनुसार त्यांच्या हद्दीत चार पोलीस स्टेशन मान्य केल्याचे अजित पवारांना सांगितले.

भावनिक होऊ नका पण चुकलो तर…

लवकरच मेट्रो चाकण, वाघोली आणि सासवडपर्यंत नेणार असल्याचा शब्द देत तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आशीर्वाद आणि भरभक्कम पाठिंबा द्या. भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो भावनिक होऊ नका. इतके दिवस इतरांना प्रेम आणि आधार दिला आता काहीदिवस आम्हाला द्या, असे म्हणत आम्ही काही चुकीचे करणार नाही. पण आम्ही काही चुकलो तर आमचा कान पकडून जाब विचार तो तुमचा अधिकार आहे.