February 27, 2024

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे,27 नोव्हेंबर 2023: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.