May 14, 2025

भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व

पुणे, २१ एप्रिल २०२५ : शहर भाजपकडून आठही विधानसभा मतदार संघातील २६ मंडल अध्यक्षांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. मंडल अध्यक्षांच्या नियुक्ती करताना नव्या-जुन्या चेहऱ्यांनाबरोबरच बाहेरून पक्षात आलेल्यांनाही यंदा संधी देण्यात आली आहे.

या २६ जणांच्या यादीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वर्चस्व दिसून आलेले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना फारसा प्रभाव पडता आलेला नाही. कोथरूड मधून मोहोळ यांचे खासमखास निलेश कोंढाकर यांची मंडळ अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे.

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज मंडलांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करताना एक लाख लोकसंख्येमागे एक मंडल अध्यक्ष नेमावा अशा सूचना प्रदेशाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हडपसर (४ मंडल), कसबा (३ मंडल), शिवाजीनगर (३ मंडल), कोथरूड (३ मंडल), वडगावशेरी (४ मंडल), कॅन्टोन्मेंट (२ मंडल), पर्वती (३ मंडल) आणि खडकवासला (४ मंडल) अशा विधानसभा निहाय २६ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे-
लोहगाव – धानोरी
संदीप मोझे
विमाननगर सोमनाथ नगर
नितीन जाधव
खराडी वडगावशेरी
आशिष देशमुख
येरवडा
रमेश गव्हाणे
शिवाजीनगर दक्षिण
शैलेंद्र बडदे
शिवाजीनगर उत्तर
आनंद छाजेड
खडकी
शाम काची
कोथरूड उत्तर (बाणेर बालेवाडी पाषाण)
लहू बालवडकर
कोथरूड मध्य
नीलेश कोंढाळकर
कोथरूड (एरंडवणे, कर्वेनगर)
कुलदीप सावळेकर
पर्वती – सिंहगड रोड
राजू कदम
मार्केट यार्ड
निखिल शिळीमकर
तळजाई
प्रशांत थोपटे
कोरेगाव पार्क घोरपडी वानवडी डायस प्लॉट -पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड
सुशांत निगडे
ससून – पुणे स्टेशन – ताडीवाला रोड भवानी रोड -काशीवाडी- सोमवार पेठ मंगळवार पेठ – रास्ता पेठ
विशाल कोंडे
कसबा गणपती
अमित कंक
समता भूमी
छगन बुलाखे
क्रांतिवीर उमाजी नाईक
प्रशांत सुर्वे
धनकवडी बालाजीनगर
महेश भोसले
वारजे – बावधन – भुसारी
गणेश वर्पे
वडगाव बुद्रूक – धायरी
यशवंत लायगुडे
धायरी-शिवणे
रूपेश घुले
कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रूक
प्रमोद टिळेकर
कोंढवा खुर्द, एनआयबीएम, मोहम्मदवाडी
अमर गव्हाणे
घोरपडी, मुंढवा, मगरपट्टा, केशव नगर, माळवाडी, साडे सतरा नळी, भोसले गार्डन
संदीप लोणकर
वैदुवाडी, रामटेकडी, काळेपडळ, ससाणे नगर हडपसर गाव
आकाश डांगमाळी