पुणे, २१ जानेवारी २०२५ ः तळजाई टाकी येथील मुख्य जलवाहिनीचे तातडीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता.२३) भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, आंबेगाव बुद्रुक व परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे. दुसऱ्या दिवशी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
तळजाई टेकडी येथील टाकी येथे मुख्य व्हॉल्व व त्याला जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी तातडीने केले जाणार आहे. या कामामुळे भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगीरी चौक,जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, सर्व्हे क्रमांक ३, ४, ७, ८, तळजाई पठार, मेघदुत सोसायटी, आनंद भवन सोसायटी या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२४) संबंधित परिसरामध्ये पाणी पुरवठा उशिरा व कमी दाबाने होणार आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन