October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकाविला

पुणे, दि. ३/०९/२०२३: ऑनलाईनरित्या मोटार बुक करीत असलेल्या तरूणाच्या हातातील २५ हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना २ सप्टेंबरला मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी सुधांशू दळवी (वय २३ रा. परेल, मुंबई )याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधांशू मूळचा मुंबईतील असून कामानिमित्त २ सप्टेंबरमला मध्यरात्रीच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर उतरला होता. त्यानंतर रस्त्याने काही अंतर चालत आल्यानंतर अलंकार चौकाजवळ तो ऑनलाईनरित्या मोबाइलवर प्रवासासाठी मोटार बुक करीत होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्याच्याकडील २५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव तपास करीत आहेत.