May 18, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीवर 22 यार्डस संघ विजयी

पुणे, दि. 15 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ऋषिकेश दौंड(204धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर 22 यार्डस संघाने पीवायसी हिंदु जिमखाना संघावर 104 धावांनी विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या मैदानावर सुरु असलेल्या या दोन दिवसीय सलामीच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी 22 यार्डस संघाचा डाव 3 षटकात बिनबाद 20धावापासुन खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल पीवायसी हिंदू जिमखानाचा पहिला डाव 82.2 षटकात सर्वबाद 278धावावर संपुष्टात आला.
याच्या उत्तरात 22 यार्डस संघाने 89.5 षटकात 7बाद 382धावा केल्या. यात ऋषिकेश दौंडने 188चेंडूत 22चौकार व 5षटकाराच्या मदतीने 204 धावा चोपल्या. त्याला साहिल नलगेने 127चेंडूत 8चौकार व 1षटकाराच्या मदतीने 69 धावा काढून साथ दिली. या जोडीने 227चेंडूत 165 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सचिन क्षीरसाठ 42, देवेंद्र पाटील 22, वेदांत काळे 16, खुश पाटील नाबाद 13 यांनी धावा काढून संघाला पहिल्या डावात 104धावांची आघाडी मिळवून दिली. पीवायसीकडून वरुण चौधरी(3-105), सोहम कांबळे(2-40), आदित्य विसपुते(1-26) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामना अनिर्णित राहिल्यामुळे 22 यार्डस संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. 22 यार्डस संघाला तीन गुण तर, पीवायसी हिंदु जिमखाना संघाला एक गुण प्रदान करण्यात आला.
सामन्याचा निकाल: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना : 82.2 षटकात सर्वबाद 278धावा(निखिल लुणावत 111(164,14×4,1×6), वरुण चौधरी 47(72,7×4,1×6), आदित्य विसपुते नाबाद 23, सोहम कांबळे 18, साईराज चोरगे 18 , सय्यद सुफयान 17, सुशांत अभंग 14, प्रथम टी 4-35, साहिल नलगे 2-55, कूश पाटील 1-25, श्रीनिवास लेहेकर 1-62) वि. 22 यार्डस: 89.5 षटकात 7बाद 382धावा(डाव घोषित (ऋषिकेश दौंड 204(188,22×4,5×6), साहिल नलगे 69(127,8×4,1×6), सचिन क्षीरसाठ 42(71,6×4), देवेंद्र पाटील 22, वेदांत काळे 16, खुश पाटील नाबाद 13, वरुण चौधरी 3-105, सोहम कांबळे 2-40, आदित्य विसपुते 1-26); सामना अनिर्णित; 22 यार्डस संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.