May 18, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावाच्या आघाडीवर अँबिशियस क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र संघांचे विजय

पुणे, दि. 17 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत अँबिशियस क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्धची लढत अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजय मिळवला.

बारणे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा आज 12षटकात बिनबाद 30 धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल अँबिशियस क्रिकेट अकादमीचा पहिला डाव 40.4 षटकात सर्वबाद 191 धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात अँबिशियसच्या गणेश कलेल 6-20, नीरज जोशी 4-89 यांनी भेदक गोलंदाजी करत युनायटेड स्पोर्टस क्लबला 27.1षटकात सर्वबाद 139 धावावर रोखले व संघाला पहिल्या डावात 52धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 68 षटकात 9बाद 249धावा केल्या. यात शिव हरपाळेने 113 चेंडूत 4चौकार व 1 षटकारासह 45 धावा, निरज जोशीने 36 धावा, ऋत्विक राडेने 26धावा, ऋषी नाळेने नाबाद 58 धावा, गौतम पुतगेने 28 धावा केल्या. ऋषी नाळे(नाबाद 58 धावा) व गौतम पुतगे(28धावा) या जोडीने सातव्या गड्यासाठी 117चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर अँबिशियस संघाने विजय मिळवला.

डिझायर स्पोर्टस कॉर्पोरेशनवर सुरु असलेल्या या दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी क्लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या आज 22षटकात 2बाद 78 धावापासून खेळ पुढे सुरु झाला. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना स्टार क्रिकेट क्लब संघाला पहिल्या डावात 62.2 षटकात सर्वबाद 266धावापर्यंत मजल मारता आली. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 86.1 षटकात सर्वबाद 274धावा काढून पहिल्या डावात 8 धावांची आघाडी घेतली. यात केदार बजाजने 120 चेंडूत 8चौकार व1 षट्काराच्या मदतीने 68 धावा, हृषीकेश त्रिगुणेने 97चेंडूत 7 चौकारासह 44 धावा केल्या. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 105चेंडूत 73 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यश हळेने 80चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 50 धावा,विशाल पारीक 24, यश भंडारी 20 यांनी धावा काढून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात स्टार क्रिकेट क्लब संघाने 15.4 षटकात 4बाद 74धावा केल्या. यात गौरव खैरे 44, प्रसाद देशमुख नाबाद 18 धावा केल्या. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावाच्या आघाडीवर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने विजय मिळवला.

ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी केडन्स संघाने 56.4 षटकात सर्वबाद 254धावा केल्या. यात मोहम्मद अरकम सईदने 55चेंडूत 12चौकाराच्या मदतीने 59 धावा, ओंकार भागवतने 42चेंडूत 10चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा, ईशान लोयाने 30 धावा, मल्हार अडक 20, मनलीव सिंग घई 19, अनुज साळवी 38 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात विलास क्रिकेट क्लबला आज दिवस अखेर 32 षटकात 9बाद 137धावा करता आल्या. यात हरिओम काळे 46, अनुराग शेळके नाबाद 32, अथर्व पाटील 15, विराज आवळेकर 13 धावा केल्या. केडन्सकडून ओंकार भागवत(5-31), मल्हार आडक(2-14), पार्थ कांबळे(2-49) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
डिझायर स्पोर्टस कॉर्पोरेशन:
पहिला डाव: स्टार क्रिकेट क्लब: 62.2 षटकात सर्वबाद 266धावा वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 86.1 षटकात सर्वबाद 274धावा(केदार बजाज 68(120,8×4,1×6), यश हळे 50(80,6×4,1×6), हृषीकेश त्रिगुणे 44(97,7×4), विशाल पारीक 24, यश भंडारी 20, ओमकार कदम 4-45, , पुष्कराज पाटील 2-31, गौरव खैरे 2-65); क्लब ऑफ महाराष्ट्र संघाकडे पहिल्या डावात 8 धावांची आघाडी;
दुसरा डाव: स्टार क्रिकेट क्लब: 15.4 षटकात 4बाद 74धावा(गौरव खैरे 44(39,6×4,1×6), प्रसाद देशमुख नाबाद 18, केदार बजाज 2-20, अनिकेत तळेकर 1-22) वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: ; सामना अनिर्णित; क्लब ऑफ महाराष्ट्र पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी;

बारणे क्रिकेट मैदान:
पहिला डाव: अँबिशियस क्रिकेट अकादमी:40.4 षटकात सर्वबाद 191 धावा वि. युनायटेड स्पोर्टस क्लब: 27.1षटकात सर्वबाद 139 धावा (नील गांधी 28, ईशान खोंड 24 , हर्ष ओसवाल 19, यश बोरकर 18, गणेश काळेल 6-20, नीरज जोशी 4-89); अँबिशियस क्रिकेट अकादमी सांघाकडे पहिल्या डावात 52 धावांची आघाडी;
दुसरा डाव:अँबिशियस क्रिकेट अकादमी: 68 षटकात 9बाद 249धावा(शिव हरपाळे 45(113,4×4,1×6), निरज जोशी 36(34,7×4), ऋत्विक राडे 26, ऋषी नाळे नाबाद 58(86,9×4,1×6), गौतम पुतगे 28, शिवराज शेळके 4 -78, विजय बनकर 3-30) विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स क्लब: ; सामना अनिर्णित; पहिल्या डावाच्या आघाडीवर अँबिशियस विजयी;

ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमी मैदान:
पहिला डाव: केडन्स: 56.4 षटकात सर्वबाद 254धावा(मोहम्मद अरकम सईद 59(55,12×4), ओंकार भागवत 52(42,10×4,1×6), ईशान लोया 30(59,5×4), मल्हार अडक 20, मनलीव सिंग घई 19, अनुज साळवी 38, आदित्य लोखंडे 3-58, अनुराग शेळके 3-36, विराज आवळेकर 3-39) वि. विलास क्रिकेट क्लब : 32 षटकात 9बाद 137धावा(हरिओम काळे 46(64,3×4,4×6), अनुराग शेळके नाबाद 32(38,4×4,1×6), अथर्व पाटील 15, विराज आवळेकर 13, ओंकार भागवत 5-31, मल्हार आडक 2-14, पार्थ कांबळे 2-49);