May 3, 2024

आयटीएफ स्प्रिंट राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशभरातून 91 खेळाडू सहभागी

पुणे, 14 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना यांच्या वतीने आयोजित आयटीएफ स्प्रिंट राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशभरातून 91 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे 15 व 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, सचिव राजेंद्र निंबालटे आणि इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे डेव्हलपमेंट ऑफिसर हरीश प्रसाद आणि इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे सदस्य यज्ञेश्र्वर बागराव यांनी सांगितले की, ही राष्ट्रीय स्पर्धा इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन यांच्या मान्यतेखाली होत आहे. सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा अशा प्रकारची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करताना संघटनेला अभिमान वाटत आहे. या स्पर्धेला मिनी ऑरेंज यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचा आम्ही आभार मानतो.
तसेच, हि स्पर्धा वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात 16ऑगस्ट रोजी पोहणे(750मीटर), सायकलिंग(18.6किलोमीटर) आणि धावणे(4.8किलोमीटर) मध्ये होणार आहे. तर , 17ऑगस्ट रोजी मिश्र सांघिक गटात रीले(250मीटर) आणि 2.4किलोमीटर धावणे यामध्ये होणार आहे.
स्पर्धेत 20राज्यांतील एथलीट्सनी सहभाग नोंदवला असुन यामध्ये महाराष्ट्र, आसाम, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरी, तेलंगणा, छत्तीसगढ, केरळ, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश आणि एसएससीबी यांचा समावेश आहे. ही अजिंक्यपद स्पर्धा गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेची पुर्वतयारी या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.
आदर्श मुरलीधरण(एसएससीबी), राहुल शिंदे (एसएससीबी), नांगाबा मतय (मणिपूर), प्रज्ञा मोहन (गुजरात), संजना जोशी(महाराष्ट्र) आणि मानसी मोहिते(महाराष्ट्र) यांसारखे मानांकित खेळाडू आपले k
कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.