December 13, 2024

पूना क्लब रॅकेट लीग 2023 स्पर्धेत ऑल स्टार्स संघाला विजेतेपद

पुणे, 12 जून 2023- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित ग्रॅविटस फाउंडेशन प्रायोजित व कॉनव्हेक्स सहप्रायोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत ऑल स्टार्स संघाने डिलाईट्स संघाचा 238-214 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सामन्यात स्क्वॅशमध्ये जसप्रीत सिंग, इव्हान गाडा, करण पटेल यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर डिलाइट्स संघाने ऑल स्टार्स संघाचा 60-50 असा पराभव केला. त्यानंतर किरण सांघवी, संजय श्रीवास्तव, किरण सोनवणे, केदार नाडगोंडे, मृणाल शहा, अभिजित गानु यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने डिलाइट्स संघाचा 59-54 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. टेबल टेनिसमध्येदेखील निलेश खंडेलवाल, सचिन राठी, रिया देशपांडे, जयदीप पटवर्धन यांनी केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर डिलाइट्स संघाने ऑल स्टार्सचा 63-59 असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. अखेरच्या लढतीत बॅडमिंटनमध्ये आरुषी पांडे, सनत परमार, किरण सांघवी, अमित परमार, मृणाल शहा, केदार नाडगोंडे यांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने डिलाइट्स संघाचा 70-37 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या ऑल स्टार्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनिल हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोके, पूना क्लब लिमिटेडच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष व क्रीडा विभागाचे अध्यक्ष अमेय कुलकर्णी, आदित्य कानिटकर आणि अमित परमार यांच्या हस्ते करण्यात आले. कारा इंटलेक्टचे रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:

ऑल स्टार्स वि.वि.डिलाईट्स 238-214

बॅडमिंटन: ऑल स्टार्स वि.वि.डिलाइट्स 70-37(लैला अल्लाना/परम लुनावत पराभुत वि.विनय राठी/आर्यन शर्मा 09-11; आरुषी पांडे/सनत परमार वि.वि.जयदीप पटवर्धन/अद्विका परमार 15-09; किरण सांघवी/अमित परमार वि.वि.सोनाली शिंदे/नीलेश खंडेलवाल 15-00; मृणाल शहा/केदार नाडगोंडे वि.वि.रोनक शहा/सतीश मुंदडा 31-17);

स्क्वॅश: ऑल स्टार्स पराभुत वि.डिलाइट्स 50-60(धीरेन शहा पराभुत वि.जसप्रीत सिंग 02-11; केदार नडगोंडे पराभुत वि.इव्हान गाडा 13-15; मृणाल शहा पराभुत वि.करण पटेल 04-15; विवान रांका वि.वि.क्रिश डेंबला 31-19)

टेबल टेनिस: ऑल स्टार्स पराभुत वि.डिलाइट्स 59-63(आदीव शहा/धीरेन शहा वि.वि.रौनक शहा/आर्यन शर्मा 11-07; किरण सांघवी/संजय श्रीवास्तव वि.वि.विनय राठी/अनेपुर्णा राठी 15-10; परम लुनावत/केदार नाडगोंडे पराभुत वि.निलेश खंडेलवाल/सचिन राठी 10-15; रशीद खोरशेदी/मृणाल शहा पराभुत वि.रिया देशपांडे/जयदीप पटवर्धन 23-31)

टेनिस: ऑल स्टार्स वि.वि.डिलाइट्स 59-54(किरण सांघवी/संजय श्रीवास्तव वि.वि.क्रिश शहा/नीलेश खंडेलवाल 11-10; किरण सोनवणे/केदार नाडगोंडे वि.वि.करण पटेल/रवी पिट्टी 15-03; मृणाल शहा/अभिजित गानु वि.वि.रोनक शहा/विनय राठी 15-10; सोहेल सांघवी/ऐश्वर्या श्रीवास्तव पराभुत वि. जयदीप पटवर्धन/सचिन राठी 18-31.

इतर पारितोषिके:

प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: मृणाल शहा

वूमेन ऑफ द टूर्नामेंट: रौनक शहा.