May 18, 2024

एनडीए मॅरेथॉन स्पर्धेत अंजनी पांडे, निशु कुमार, अश्विनी देवरे, कृष्णा सिरोठिया, यांना विजेतेपद

पुणे १७ ऑक्टोबर २०२३ – ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने व वेद निर्मिती रियालिटीने पुरस्कृत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृमहोत्सवी (७५ वर्षे) स्थापना वर्षा निमित्त एनडीए मॅरेथॉन स्पर्धेत अंजनी पांडे, निशु कुमार, अश्विनी देवरे, कृष्णा सिरोठिया, वेदांशी जोशी, अनुभूती चतुर्वेदी, पारसरन हलीझोल, संजय नेगी, प्राधि बुधवार, सीडीटी रितुल, तृप्ती गुप्ता, मोहित यादव, अनुराग कोनकर आणि नरेंद्र पाटील यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

एनडीए येथे पार पडलेल्या शर्यतीत देशभरातून 13500 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये एनडीएच्या 1300 कॅडेटस यांनी देखील विविध शर्यतीत सहभाग घेतला होता. हि स्पर्धा ४२ कि.मी. पूर्ण मॅरेथॉन, २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉ़न, १० कि.मी, ५ कि.मी. आणि ३ कि.मी मध्ये पार पडली.

स्पर्धेत ४२किमी महिला गटात १८ ते ३५ वयोगटात अंजनी पांडेने (०४:१९:५२सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला. तर , ३६ ते ४५ वयोगटात अश्विनी देवरे(०४:०६:१०सेकंद) हिने अव्वल क्रमांक पटकावला. ४२किमी पुरुष १८ ते ३५ वयोगटात निशू कुमार(०२:५०:२३सेकंद) याने तर ३६ ते ४५ वयोगटात कृष्णा सिरोठिया(०३:२३:४८सेकंद) यांनी पहिला क्रमांक पटकावला. २१किमी महिला १८ ते ३५ वयोगटात वेदांशी जोशी(०१:४१:४९सेकंद)ने तर, ३६ ते ४५ वयोगटात अनुभूती चतुर्वेदी(०१:४४:४९सेकंद) वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.

२१किमी पुरुष १८ ते ३५ वयोगटात पारसरन हलीझोल(०१:१२:०८सेकंद) याने विजेतेपद ,मिळवले. तर ३६ ते ४५ वयोगटात संजय नेगी(०१:२३:०६सेकंद) याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदके अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: ४२किमी महिला गट:
१८ ते ३५ वयोगट:१.अंजनी पांडे(०४:१९:५२सेकंद), २.रजनी सिंग(०४:३४:५५ सेकंद); ३.रविता रामविलास राजभर ०४:४६:२१सेकंद);
३६ ते ४५ वयोगट: १.अश्विनी देवरे(०४:०६:१०सेकंद), २.आरती अग्रवाल(०४:२१:५५ सेकंद);

४२किमी पुरुष गट:
१८ ते ३५ वयोगट: १. निशू कुमार(०२:५०:२३सेकंद), २.श्रीकांता महातो(०३:००:०५सेकंद), ३.गणेश खोमणे(०३:२०:५६सेकंद);
३६ ते ४५ वयोगट: १. कृष्णा सिरोठिया(०३:२३:४८सेकंद), २. लेफ्टनंट कर्नल स्वरूप सिंग कुणाल(०३:२४:१९सेकंद), ३.वसंत पंडिता(०३:२७:११सेकंद);

२१किमी महिला गट:
१८ ते ३५ वयोगट: १.वेदांशी जोशी(०१:४१:४९सेकंद), २.भावनीत कौर(०१:४२:५२सेकंद), ३.प्रियांका पाईकराव(०१:४३:५२से);
३६ ते ४५ वयोगट: १.अनुभूती चतुर्वेदी(०१:४४:४९सेकंद), २.नेत्रा(०१:४७:३०सेकंद), ३.अंजू चौधरी(०१:५१:५६सेकंद);

२१किमी पुरुष गट:
१८ ते ३५ वयोगट: १.पारसरन हलीझोल(०१:१२:०८सेकंद), २.सीडीटी निखिल चंद(०१:१९:२०सेकंद), ३.सीडीटी प्रिन्स बमल(०१:२१:३३सेकंद);
३६ ते ४५ वयोगट: १.संजय नेगी(०१:२३:०६सेकंद), २.अंकुश गुप्ता(०१:२५:०३सेकंद), ३.योगेश सानप(०१:२५:४१सेकंद);

१० किमी महिला गट:
१४ ते १८ वयोगट: १.प्राधि बुधवार(००:५८:००सेकंद); २.सिद्धी गुरव(०१:०३:००सेकंद), ३.ह्रिया शाह(०१:०६:१४सेकंद);
१९ ते ३५ वयोगट: १.सीडीटी रितुल(००:४७:३९सेकंद), २.आस्था लाहेरू(००:५०:४३सेकंद), ३.जयश्री वनमा(००:५०:४८सेकंद);
३६ ते ४५ वयोगट: १.तृप्ती गुप्ता(००:५४:०७सेकंद), २.हसीना थेमाली(००:५४:२१सेकंद), ३.अदिती मोहिले(००:५८:२०सेकंद);

10किमी पुरुष गट:
१४ ते १८ वयोगट: १.मोहित यादव(००:३९:१३सेकंद), २.वैभव येडगे(००:४१:३९सेकंद), ३.अविनाश लोंढे(००:४२:२३सेकंद);
१९ ते ३५ वयोगट: १.अनुराग कोनकर(००:३४:०२सेकंद), २.आनंदू एएस(००:३४:२९सेकंद), ३.कोमिंधला पुरुषोत्तम(००:३४:५७सेकंद);
36 ते 45 वयोगट: १.नरेंद्र पटेल(००:४२:४०सेकंद), २.सचिन निकम(००:४३:३५सेकंद), ३.अजित निकम(००:४४:४१सेकंद);