May 3, 2024

‘एएनपी रन पुणे रन’ धर्मादाय अर्ध मॅरेथॉन शर्यतीत स्पर्धेत अनुराग कोनकर, अनुभूती चतुर्वेदी, धीरज हेळंबे, नीलम वैद, अंकित गर्ग, सयुरी दळवी यांना विजेतेपद

पुणे, 8 एप्रिल 2024: रिअल इस्टेट डेव्हलपरमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या एएनपी कॉर्पच्या वतीने वंचित समुदायाच्या समर्थनार्थ आयोजित ‘एएनपी रन पुणे रन’ अर्धमॅरेथॉन स्पर्धेत अनुराग कोनकर, अनुभूती चतुर्वेदी, धीरज हेळंबे, नीलम वैद, अंकित गर्ग, सयुरी दळवी यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेत 21 किमीमध्ये 45वर्षांखालील पुरुष गटात अनुराग कोनकर (01.24.42 से)याने वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, चिन्मय शहा (01.28.16 से) व विश्वास सूर्यवंशी (01.28.40 से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात अनुभूती चतुर्वेदी(01.42.31से) वेळ नोंदवत हिने विजेतेपद पटकावले.
याच 45वर्षांवरील पुरुष गटात धीरज हेळंबे(01.33.09से)याने वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, महिला गटात नीलम वैद(02.04.17से) वेळ नोंदवत हिने विजेतेपद पटकावले.
10 किमी 45 वर्षांखालील पुरुष गटात अंकित गर्ग (00.39.20से) याने वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. महिला गटात सयुरी दळवी(00.49.16से) हिने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदाला गवसणी घातली. 45 ते 60 वर्षांवरील पुरुष गटात महादेव घुगे(00.44.42से) याने तर, महिला गटात एंजेला पंत(00.55.30से) हिने विजेतेपद पटकावले. 60 वर्षांवरील गटात पुरुषांमध्ये शिवशंकर अंबाडी(00.51.49से) याने तर,
महिला: 1.दुर्गा सिल (00.59.16 सेकंद).
स्पर्धेत 3000 धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील अर्धमॅरेथॉन स्पर्धेचा फ्लॅगऑफ सकाळी 5:30 वाजता झाला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, पदक आणि आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एएनपी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील आडवानी, गीता आडवानी,अमोल बालवाडकर, नाना काटे, चेतन भुजबळ, ऋषी आडवानी, सौरभ आडवानी, तनुज फेरवानी, रोशन तेजवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे आणि शिल्पा गोपीनाथ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:(प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमानुसार):
21 किमी गट(45वर्षांखालील)
पुरुष: 1. अनुराग कोनकर (01.24.42 से), 2. चिन्मय शहा (01.28.16 से), 3. विश्वास सूर्यवंशी (01.28.40 से);
महिला: 1.अनुभूती चतुर्वेदी(01.42.31से), 2.स्मिता झांजुर्णे(02.02.48से), 3.शैलजा कुमार(02.11.35से);
21 किमी (45वर्षांवरील):
पुरुष: 1.धीरज हेळंबे(01.33.09सेकंद), 2.हितेंद्र चौधरी(01.33.22सेकंद), 3.रवींद्र कुमार(01.33.27सेकंद);
महिला: 1.नीलम वैद(02.04.17सेकंद), 2.बकुल बर्नार्ड(02.41.52सेकंद), 3.संगीता फिरके(02.42.11सेकंद);
10 किमी(45 वर्षांखालील):
पुरुष: 1.अंकित गर्ग (00.39.20से), 2.आर्यन पवार (00.43.01से), 3.काशिनाथ देवकाते (00.44.55से);
महिला: 1.सयुरी दळवी(00.49.16से), 2.नेहा दळवी(00.52.23से), 3.प्रियांका गुरनानी(00.56.47से);
10 किमी(45 ते 60 वर्षांवरील):
पुरुष: 1.महादेव घुगे(00.44.42से), 2.सुनील शिंगाटे(00.51.25से), 3.राम मौर्य(00.54.17से);
महिला: 1.एंजेला पंत(00.55.30से), 2.श्रुती भिडे(01.02.00से), 3.रेश्मा जमीनदार(01.05.38से);
10 किमी (60 वर्षांवरील):
पुरुष: 1.शिवशंकर अंबाडी(00.51.49से), 2.ब्रिगेडियर इसराणी(01.12.20से);
महिला: 1.दुर्गा सिल (00.59.16 सेकंद).