May 15, 2024

पुणे: धरणे भरली; पुण्यातील पाणी कपात मागे

पुणे, २९ जुलै २०२३ : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील धरणांमध्ये २१.६२ टीएमसी पाणीसाठा जमा झाल्यामुळे शहरात लागू असलेली पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रविवार म्हणजेच ३० जुलैपासून शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत टेमघर, वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणे महापालिकेने १८ मे पासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या निर्णयाचा फटका शहाराच्या अनेक भागांना बसला. गुरुवारी पाणी बंद असल्यानंतर शुक्रवारी व शनिवारी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत होता. जलवाहिनी मध्ये कमी दाब निर्माण झाल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेने जवळपास २०० ठिकाणी प्रेशर वॉल व बसवून पाणीपुरवठा वाच म्हणजे कळतंय सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन आठवड्यापासून खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला धरण जवळपास शंभर टक्के भरल्याने धरणातून आवश्यकतेनुसार पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. अशा स्थितीत शहरातील पाणी कपात मागे घ्यावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांतर्फे केली जात होती. त्या संदर्भात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. यावेळी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार,पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीत सध्या धरणामध्ये २१. ६२ टीएमसी उपलब्ध आहे हा पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ७२ टक्के इतका असल्याने आणि पावसाळा संपण्यास आणखीन दोन महिने कालावधी शिल्लक आहे. या काळात धरणे शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे असा अंदाज लावून ही पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ३०जुलैपासून शहरातील पाणीपुरवठा दैनंदिन स्वरूपात केला जाईल असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे