April 28, 2024

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाला विजेतेपद

पुणे, दि.29 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाने रॉबिन्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत किड्स गटात अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत फिंच संघाने रॉबिन्स संघाचा 3-2 असा पराभव केला. गोल्ड खुला दुहेरी 1गटात फिंचच्या रिया करंदीकरला रॉबिन्सच्या रोहीन लागुने 09-15, 15-10, 13-15 असे पराभुत केले. गोल्ड खुला दुहेरी 2 गटात फिंचच्या वरद चितळेने अनय इंगळहळीकरच्या साथीत रिशिता खोर्जेकर व निरन भुरटचा 14-15, 15-11, 15-11 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. खुल्या दुहेरी 3 गटात फिंचच्या अनिश घैसास व अन्वित राजवाडे यांनी रियान करंदीकर व अथर्व रोडे यांचा 09-15, 13-15 असा पराभव करून संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. खुल्या दुहेरी 4 गटात फिंचच्या विवान ओगले व आनंदी बेडेकर यांनी परम जालन व ऋषभ बेडेकर यांचा 11-15, 15-13, 15-13 असा तर मिश्र दुहेरी 5 गटात विहान सोमण व आरव श्रॉफ यांनी रॉबिन्सच्या रीत जालन व ईशान जोशी यांचा 15-13, 12-15, 15-14 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या फिंच संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागु, ट्रूस्पेसचे संचालक अश्विन त्रिमल, उल्हास त्रिमल आणि बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, केदार नाडगोंडे, समीर जालन, दिप्ती सरदेसाई आणि रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:
फिंच वि.वि.रॉबिन्स 3-2
(गोल्ड खुला दुहेरी 1: रिया करंदीकर पराभुत वि.रोहीन लागु 09-15, 15-10, 13-15; गोल्ड खुला दुहेरी 2: वरद चितळे/अनय इंगळहळीकर वि .वि. रिशिता खोर्जेकर/निरन भुरट 14-15, 15-11, 15-11; खुला दुहेरी 3: अनिश घैसास/अन्वित राजवाडे पराभुत वि.रियान करंदीकर/अथर्व रोडे 09-15, 13-15; खुला दुहेरी 4: विवान ओगले/आनंदी बेडेकर वि.वि.परम जालन/ऋषभ बेडेकर 11-15, 15-13, 15-13; मिश्र दुहेरी 5: विहान सोमण/आरव श्रॉफ वि.वि.रीत जालन/ईशान जोशी 15-13, 12-15, 15-14).

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुले-एकेरी गट): रोहिन लागु
सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुली-एकेरी गट):रिया करंदीकर
११ वर्षावरील सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुले-दुहेरी गट): रियान करंदीकर व वरद चितळे
११ वर्षावरील सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुली-दुहेरी गट): प्रिशा पटवर्धन
११वर्षाखालील सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुले-दुहेरी गट): अनय इंगळहळीकर;
११वर्षाखालील सर्वोत्कृष्ट खेळाडू(मुली-दुहेरी गट):रीत जालन.